मुंबई इंडियन्सना जिंकवणाऱ्या या आज्जी कोण ?
 महा त भा  22-May-2017आयपीएलच्या इतिहासात काल मुंबई इन्डियन्स आणि रायझिंग पुणे जॉइन्ट्स मध्ये झालेला सामना सगळ्यात अटीतटीचा सामना ठरला. यामध्ये मुंबईने पुण्यावर केवळ १ धावेने मात केली आणि मुंबई विजयी झाली. मात्र मुंबईच्या या विजयाचे कारण वेगळेच असल्याचे नेटकरी म्हणत आहेत. मुंबई इन्डियन्सच्या विजयासाठी प्रार्थना करणाऱ्या एक आज्जी काल कॅमेऱ्यात कैद झाल्या आणि सोडल मीडियावर पोस्ट्सचा अक्षरश: पाऊस पडला. या आज्जींच्या प्रार्थनेमुळेच मुंबईचा विजय झाला असा दावा नेटकरी करत आहेत.

  या आजी कोण असा प्रश्न पडला असता, त्या रिलायन्सच ग्रुपचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची सासू आणि मुंबई इंडियन्स संघाची मालकीण म्हणजेच नीता अंबानी यांच्या आई आहेत, त्याचे नाव पूर्णिमा दलाल आहे. प्रसिद्ध अभिनेते अभिषेक बच्चन यांनी या बाबीचा खुलासा केला. कॅमेऱ्याने एकवार त्यांना टिपल्यावर सगळ्यांच्या नजरा मुंबईच्या खेळावर नसून त्या आज्जींवर होत्या.

Embeded Object

त्यांच्या प्रार्थनेमुळेच मुंबईचा विजय झाला. आज्जींचे आशीर्वाद नेहमीच कामास येतात, आज्जींच्या प्रार्थनेला फळ आले अशा आशयाच्या विविध पोस्ट्स सोशल मीडियावर सध्या गाजत आहेत.