वाघाचा संसारात पडल्यानंतरचा पहिला ‘सोशल’ उखाणा!
 महा त भा  04-Jul-2017


गेल्या एक-दोन वर्षात अमेय वाघ या युवा कलाकाराने हजारो तरूणींवर एकप्रकारची मोहिनी टाकली होती. झी मराठी वरील त्याच्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’नंतर तो प्रंचड लोकप्रिय झाला आणि आता तर गेल्या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या ‘मुरांबा’ चित्रपटामुळे तो लाखो तरूणींच्या ‘दिल की धडकन’ बनला होता. पण या सगळ्या मुलींच दुर्देव असं की त्याने मुरांबानंतर लगेचच लग्नाची घोषणा केली व गेल्या रविवारी तो साजिरी देशपांडे सोबत विवाह बंधनात देखील अडकला.

आता यापुढची गोष्ट म्हणजे अमेयने आज लग्नानंतर सोशल मीडियावरून पहिल्यांदाच ‘उखाणेबाजी’ सुरू केली आहे. चला नाव घेतो, असं म्हणून त्याने थेट ‘जीएसटी’चा उल्लेख करतं साजिरीच्या नावामध्ये मुरांबाचे जाता जाता प्रमोशन केलं आहे. आता नेटिझन्सच्या म्हणण्यानुसारच हा उखाणा फारसा काही जमला नाहीये, पण त्यातल्या त्यात वेळचालवून नेऊ शकतो. 

‘’तुझं लग्न झाल्यामुळे मुलींमध्ये असंतोष व मुलांमध्ये दिवाळी’’, ‘तुझ्या संसाराची कैरी आत्ताच तर हातात आलीये, मुरांबा व्हायला वेळ आहे अजून’, ‘तुम्हा दोघांचा हा मुराम्बा हा असाच टेस्टि राहून दे आणि दिवसागणिक तो आणखीन गोड होऊ दे सुखात राहा हसत राहा मजेत राहा’ या व यांसारख्या अनेक प्रतिक्रिया अमेयच्या या फेसबुक पोस्टवर येऊन धकडत आहेत. प्रत्येक जण नवदाम्पत्याचे अभिनंदन करून शुभेच्छा देत आहेत.